११ डिसेंबर रोजीच्या 'लोकसत्ता' या दैनिकामध्ये अजित नरदे यांनी 'स्वातंत्र्य हवे, करूणा नको' हा लेख लिहून कांदा या पिकाच्या बाबतीत वाचकांना साक्षर बनवण्याचं काम केलं. नरदे यांनी कांदा मार्केटच्याबाबतीत फोलपणा समोर आणून दोन्ही बाजू या लेखात मांडल्या आहेत. यावर उलट सुलट प्रतिक्रीया येणं साहजिकच आहे. मात्र, शेतकऱ्यांवरच देशाच्या सगळ्या समस्येचं खापर फोडणे (विशेष म्हणजे अर्थव्यवस्थेचं) हे काय मनाला अजिबात पटत नाही. शेतकरी आज संकटात असताना, त्यांना थेट मदत तर सोडाच साधी संवेदनशीलताही भावे या माणसानं दाखवली नाही याच फार वाईट वाटतं. सुधीर भावे यांनी नरदे यांच्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून 'लोकसत्ता' दैनिकाला पत्र पाठवले होते. १२ डिसेंबरच्या लोकसत्तामध्ये हे पत्र छापून आले आहे. भावे यांच्यासारखे अजून हजारो आयकरदाते असतील जे त्यांच्याप्रमाणेच शेतकऱ्यांबद्दल विचार करतात. भावे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "शेतकरी शेती करतात, कारण ती त्यांची आर्थिक गरज आहे म्हणून, ते देशावर मेहेरबानी करत नाहीत." म्हणजे सरळ सरळ महाशय असं म्हणत आहेत, की 'शेतकरी अन्नधान्य पिकवून देशावर काही उपकार करत नाहीत.' आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे, की या देशातील सजग नागरिक काहीना काही या देशासाठी काम करत असतो. वेगवेगळ्या माध्यमातून तो काम करत राहतो. शिक्षक, वकील, डॉक्टर, शेतकरी, बारा बलुतेदार, शेतकरी, सामान्य नागरिक, करदाता इत्यादी आपापल्या परीने काहीतरी देशासाठी योगदान देत असतात. म्हणून भावेजी आपणही या देशासाठी योगदान देतच आहात. यांना एक सांगितलं पाहिजे आजपर्यंत लाखो शेकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्ताचच बघायचं झालं तर २०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्रातील १४ हजार शेकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एखाद्यातरी आयकरदात्याने आत्महत्या केल्याचं आपण ऐकिवात आहात काय? तरिही तुम्ही म्हणत असाल की, शेतकरी काय मेहेरबानी करत नाही तर आपल्या संवेदनशीलपणाची कीव येते.
आसपास घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घडामोडींवर वैयक्तिक मत आणि त्याचा माझ्या परीने लावलेला अर्थ...
शुक्रवार, १० मे, २०२४
शेतकरी देशावर मेहरबानी करत नाही?
शेवटी भावे या पत्रात म्हणतात "शेतकऱ्यांना सगळंच फुकट असायला हवं अशी त्यांची मानसिकता झाली आहे." अहो, महाशय 'तुम्हाला कुणी भीक मागत नाही, शेतकरी आपल्या हक्काचं सरकारकडे मागत आहे.' शेतकरी विरोधी कायदे करून त्यांच्या जमिनीवर मोठमोठ्या कंपन्या उभारता यालाच तुम्ही विकास म्हणता आहात. कमाल आहे बुवा 'शेतकरी शेती करतात म्हणून देशातील लोकांना खायला मिळत.' या ओळी तुम्हाला गुळगुळीत वाटत आहेत. शेतात पिकवलेला चांगला गहू, ज्वारी, तांदूळ, दूध व इतर धान्ये शेतकरी बाजारात विकतो अन् शिल्लक राहिलेलं मात्र स्वतः खातो. हे चांगलं चांगलं तसंच ओर्ग्यानिक खायला कुठून मिळत हो. हा पुरवठा बंद केला तर काय होईल? पण बळीराजा तस करणार नाही. ज्यावेळी शेतमालाचे भाव पडतात तेव्हा कधी आपण शेकऱ्यांच्या बाजूने असचं एखाद पत्र खरडलं आहे का? शेतकऱ्यांनी शेतमालाची नासाडी करू नये, रस्त्यावर फेकून देऊ या तुमच्या मताशी सहमत आहे. पण शेकऱ्यांवर अशी वेळ का येते? याचा कधीतरी आपण विचार कराल आणि शेकऱ्यांबद्दलचे गैरसमज दूर कराल अशी आशा आहे.
- अजय नेमाने (पिंपळवाडी ता. जामखेड, अहमदनगर)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा